Ad will apear here
Next
महिला बचत गटांसाठी ‘घरोबार’चे व्यासपीठ
‘फिक्की फ्लो’चा उपक्रम
‘घरोबार’ दालनातील महिला बचतगट उत्पादन  प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ‘फिक्की फ्लो’च्या अध्यक्षा रितू छाब्रिया,उपाध्यक्षा उषा पूनावाला, अनिता सणस, ‘घरोबार’च्या संचालिका रश्मी माहेश्वरी, अवनी श्रॉफ, वैशाली राणे, धनश्री लाड आदी

पुणे : ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण व्हावे, बचत गटांतील महिलांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या लेडीज ऑर्गनायझेशन अर्थात ‘फिक्की फ्लो’ संस्थेच्या वतीने ‘घरोबार डॉट कॉम’चे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. एनआयबीएम-कोंढवा रस्त्यावरील दी रॉयल हेरिटेज मॉलमध्ये असलेल्या ‘घरोबार’च्या दालनामध्ये ग्रामीण भागातील उद्योजिका, बचत गट, विशेष मुले यांनी तयार केलेल्या उत्पादनांना प्राधान्य देण्यात आले असून, येथे कापडी पर्स, पाउच, आकर्षक कापडी फाइल्स, कुशन कव्हर्स, भेटकार्डे, सौंदर्यप्रसाधने, दागिने यांसह ग्रामीण, तसेच पारंपरिक शैलीचे दर्शन घडविणाऱ्या वस्तू उपलब्ध आहेत.

‘फिक्की फ्लो’च्या अध्यक्षा रितू प्रकाश छाब्रिया यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने स्वयम या कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच झाले. ‘फिक्की फ्लो’च्या उपाध्यक्षा उषा पूनावाला, सदस्या अनिता सणस, ‘घरोबार’च्या संचालिका रश्मी माहेश्वरी, अवनी श्रॉफ, बचत गटांच्या समन्वयिका वैशाली राणे, उद्योजिका धनश्री लाड या वेळी उपस्थित होत्या. 


‘येत्या काळात डी-मार्ट, तसेच रिलायन्ससोबतही अशी भागीदारी करून महिलांच्या सक्षमीकरणाचे काम केले जाणार आहे. निरनिराळ्या बचतगटांबरोबर व विशेष विद्यार्थ्यांसोबत काम करणाऱ्या वैशाली राणे आणि ग्रामीण भागातील महिला व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करणाऱ्या धनश्री लाड यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम नक्की यशस्वी होईल,’ असे अनिता सणस यांनी सांगितले. 

‘वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, विशेष विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या संस्था अशा विविध संस्थासोबत संपर्क साधत त्यांनी तयार केलेल्या वस्तू शहरातील नागरिकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न याद्वारे केला जात असून, उत्पादकांसाठी कार्यशाळा आयोजित करून, त्यांना प्रशिक्षणही देण्यात येते,’ असे उषा पूनावाला यांनी नमूद केले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZWDCE
Similar Posts
‘फिक्की फ्लो’कडून वृक्षारोपण पुणे : ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ची (फिक्की) महिला शाखा असलेल्या ‘फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन’ अर्थात ‘फ्लो’ या संस्थेच्या वतीने वृक्षरोपण करण्यात आले. पुणे शुद्ध हवेचे ठिकाण व्हावे, याकरिता शहर आणि परिसरालगतच्या भागात संस्थेच्या वतीने वृक्षारोपण सप्ताह साजरा करण्यात आला.
‘गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा’ पुणे : ‘समाजात कायदा व सुव्यवस्था राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. ज्येष्ठांसाठी, महिलांसाठी, लहान मुलांसाठी असे वेगवेगळे सेल सुरू करून त्यामार्फत अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा आणि शहराला सुरक्षित बनवण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. मात्र, समाजातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी
महिला सक्षमीकरणासाठी ‘फ्लो हाफ मॅरेथॉन’ पुणे : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज लेडीज ऑर्गनायजेशन अर्थात ‘फिक्की फ्लो’च्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी येत्या डिसेंबरमध्ये ‘फ्लो हाफ मॅरेथॉन’ आयोजित करण्यात आली आहे. या मॅरेथॉनसाठी फिक्की फ्लो आणि ब्रिजस्टोन यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.
शिल्पा शेट्टीच्या ‘हेल्थ अँड फिटनेस’ अॅपचे अनावरण पुणे : ‘नियमित व्यायाम, सकस आहार, ध्यान आणि सकारात्मक विचार या गोष्टी तुम्हाला निरोगी बनवतात. आनंदी जीवन जगण्यासाठी ‘स्वस्थ राहा मस्त राहा’ हा आरोग्यमंत्र अत्यंत गरजेचा आहे. माझ्या सौंदर्य आणि तंदुरुस्तीच्या मागे हाच मंत्र आहे. तुम्ही सर्वानी हा मंत्र अंमलात आणावा, नियमित व्यायाम करून चांगला आहार घेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language